काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप, दोन बड्या नेत्यांनी ठोकला रामराम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसतांना दिसत आहे. नुकतेच काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यातच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. कारणही तसच आहे. मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेता कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरून काढले आहे.

कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र हे छिंदवादाच्या ५ दिवसांचा दौरा करणार होते. पण त्यांनी तो रद्द करून अचानक दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोघे दिल्ली दौऱ्यावर आहेत. कमलनाथ आणि नकुलनाथ काँग्रेस सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासोबत १० ते १२ आमदार असल्याचंही सांगितलं जातं. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. त्यांनी पक्ष सोडला तरी कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत प्रश्न कायम आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. या दोन्ही नेत्यांना राज्यसभेची संधी मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.