तरुणाला लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष ; १५ लाखांची फसवणूक

0

पाचोरा

लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन वेळोवेळी तरुणांकडून १५ लाख १६ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथील शेती करणाऱ्या व तलाठी कॉलनी येथे राहणारे प्रवीण हरी शिंदे यांच्याकडून आरोपी रामकृष्ण शंकर राऊत याने लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून प्रवीण शिंदे आणि त्यांच्या भावाने २० ऑगस्ट २०१९ ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान १५ लाख १६ हजार रुपये नाशिक रोड खात्यातून आरोपीच्या खात्यात जमा केली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीण शिंदे यांनी याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला दिल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.