डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याची विष घेत आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बोदवड तालुक्यातील वरखेड येथे दुःखद घडली आहे. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. नितीन गणेश राणे (वय ३६, रा. वरखेड ता. बोदवड) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बोदवड तालुक्यातील वरखेड येथे नितीन गणेश राणे हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांची गावातच शेती असून शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. गेल्यावेळेस शेतात कपाशीची लागवड केली होती. परंतु त्यातून निम्म उत्पन्न देखील मिळाले नाही. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यातूनच नितीन राणे यांनी शेतात फवारणीचे औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचारादरम्यान दि. १० रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.