कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेत आत्महत्या…

0

 

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील शेतकरी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (४८) यांनी आपल्या शेतातील नापिकी, अल्प उत्पन्न, शेतातील पिकांची दयनीय अवस्था व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळुन शनिवारी आपल्या शेतातच दि.१९ नोव्हेंबर रोजी विष प्राषण केले, त्यानंतर उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र शनिवार दि.१९ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अडीच एकर कोरडवाहु शेतात ते मेहनत करुन संसाराचा गाडा हाकत होते. त्यांच्या पश्चात वयोवृध्द आई वडील, पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.