सासवडच्या श्री संत सोपानकाका मंदिरात मुक्ताई मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठा…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

श्री क्षेत्र सासवड जि. पुणे येथे संत सोपान काका महाराज यांची समाधी आहे. तेथे संत मुक्ताई बंधू सोपान काका यांनी आईसाहेबांचा लहानपणी सांभाळ केलेला होता. त्याची आठवण म्हणून संत सोपान काका संस्थान सासवड यांनी संत मुक्ताई नूतन मंदिर बांधले. त्यामध्ये संत मुक्ताबाई समाधीस्थळ मुक्ताईनगर येथून संस्थानच्या वतीने आज सासवडला मुर्ती पाठविण्यात आली.

संत मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, रविंद्र महाराज हरणे, सम्राट पाटील, लखन महाराज सासवडला मूर्ती घेऊन रवाना झाले. दि. 30 नोव्हेबर ते 2 डिसेंबर पर्यंत मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात  येईल. या सोहळ्यास मुक्ताई फडावरील वारकरी भाविक उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी आज पहाटे सुदेश दिगंबर महाजन तुरकगोराळा यांनी संपत्ती महापूजा अभिषेक केला व भाविकांना फराळ वाटप केले. आज संतज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा असल्याने आळंदीला न जावू शकल्याने आज कार्तिक वारी एकादशी मुक्ताई मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.