फैजपूर ;– तालुक्यातील पाडळसा येथे अज्ञात चोरटयांनी बंद घराचे लोखंडी काडी तोडून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १५ रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, भालोद ता. यावल येथील रहिवाशी आणि सेवानिवृत्त उपशिक्षक असलेले जगन्नाथ बाबुराव चौधरी वय ७२ यांच्या मौजे पाडळसागावातील ग्रामपंचायतीच्या मागे असलेल्या बंद घराच्या गच्चीवरून अज्ञात चोरटयांनी जिन्यातून घरात प्रवेश करून कपाटातील १६ हजार रुपये किमतीचे सोन्याची २ अंगठी, आणि ३१ हजार रुपये रोख असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी १५ रोजी दुपारी साडेचार ते १९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडला .
याप्रकरणी जगन्नाथ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोहेकॉ उमेश चौधरी करीत आहे.