हार्दिकच्या दुखापतीमुळे होऊ शकते ‘या’ खेळाडूंची एन्ट्री

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बांग्लादेश विरुद्ध दमदार विजयानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला आपला प्रमुख खेळाडू हार्दिक पांड्याशिवाय खेळावं लागू शकत. कारण हार्दिक पांड्या काल बांग्लादेश विरुद्ध गोलंदाजी करत असतांना दुखापतग्रस्त झाला आहे. हार्दिकला झालेल्या दुखापतीबाबत डॉक्टरांनी अजून काही सांगितले नाही. दुखापत किती गंभीर आहे याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या खेळण्याबद्दल अजूनही प्रश्न पडला आहे. हार्दिक पांड्या रविवार सकाळपर्यंत फिट झाला नाही, तर त्याच्याजागी टीम इंडियात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते. कारण हार्दिक पांड्याच्या तोडीचा पर्यायी खेळाडू कॅप्टन रोहित शर्माकडे नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत टीम इंडियाला रणनीतीत थोडा बदल करावा लागेल. हार्दिकच्या गैरहजेरीत २ खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता आहे. हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोघं जाबदाऱ्या सांभाळतो.

हार्दिकच्या जागी टीममध्ये येणारे ते दोघे कोण?
हे दोन्ही खेळाडू टॅलेंटेड आहेत. सध्याच्या टीम कॉम्बिनेशनमुळे त्यांना बाहेर बसावं लागत आहे. न्यूझीलंड विरुद्ध संधी ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असेल. दोघांना आपली उपयुक्तता सिद्ध करता येईल. हार्दिकच्या जागी ६ व्या नंबरवर फलंदाजासाठी सूर्यकुमार यादवची टीममध्ये निवड होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून बाहेर असलेला मोहम्मद शमीची प्लेइंग इलेव्हनमध्ये एंट्री होऊ शकते. शार्दुल ठाकूरने बांग्लादेश विरुद्ध 9 ओव्हरमध्ये 59 धावा दिल्या. ही चांगली बाब नाहीय. त्याच्यावर भरवसा नाही ठेवता येणार. त्याजागी मोहम्मद शमीकडे बराच मोठा अनुभव आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.