ओबीसीची चळवळ दडपण्यासाठी भुजबळांना टार्गेट केले जाते; बाळासाहेब कर्डक

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ओ.बी.सी आरक्षण अधिकार महामेळावा भडगाव येथे लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय दि.१९ रोजी संपन्न झाला. मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त करतांना अखिल भारतीय समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की, ओबीसी समाज बांधवांना मिळालेले आरक्षण हे समाज व्यवस्थेत शूद्र असल्याकारणाने मिळाले हजारो वर्ष गावगाड्यातील सेवा केली. पडेल ती कामे केली समाज व्यवस्थेने हीन पणाची वागणूक दिली. म्हणून घटनेनेआरक्षण दिले पुढे मंडलआयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण लागू करण्यात आले ते भुजबळ साहेब यांनी ओबीसी समाज घटकांना एकत्र करून महाराष्ट्र मध्ये लागु केले. ओबीसी आरक्षण चळवळीचे सरसेनापती भुजबळ साहेब आहेत.

न्यायालयीन राजकीय सामाजिक पातळीवर लढत आहेत, म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात आहे. जेणेकरून ओबीसी आरक्षण चळवळ दडपली जाईल पण प्रत्यक्षात तसे होणे शक्य नाही. चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता समता सैनिक सक्षमं आहेत. साहेबांच्या सोबत आहेत. यावेळी जळगांव जिल्हाअध्यक्ष सतीश महाजन, संपर्क प्रमुख अनिल नाळे, नाशिक शहर अध्यक्ष उमेश महाजन, हरिष महाजन, तालुका अध्यक्ष भानुदास महाजन, शहर अध्यक्ष भिकन महाजन, शिवदास महाजन, कैलास महाजन विजय महाजन, ज्ञानेश्वर महाजन, महीला जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, कुंभार समाज अध्यक्ष डॉक्टर करणकाळ, सी.सी वाणी, अशोक खलाणे, भीमराव खलाणे, जगन्नाथ महाजन, काळे सर, डाॅ.उत्तमराव महाजन, टाकळी प्र.चा सरपंच कविता महाजन, भगवान महाजन, नितिन महाजन, देवराम महाजन, भगवान रोकडे, प्रदीप महाजन, दिनेश पाटील, रविंद्र महाजन, शालिकराम महाजन, प्रकाश महाजन, विजय लक्ष्मण महाजन, उद्धव महाजन, बाळासाहेब संतोष महाजन, प्रकाश महाजन, सुरेंद्र विठ्ठल महाजन,विजय नावडकर, कपिल चौधरी, श्याम पाटील, अविनाश माळी, संतोष महाजन, प्रकाश महाजन, सुनील शिंदे, सुनील कासार, मनोहर चौधरी, जकिर कुरेशी, विठोबा मिस्तरी, संजय पवार, आबा वाणी, विविध ओबीसी आरक्षण चळवळीचे कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश रोकडे, सोनाली महाजन यांनी तर आभार भानुदास महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.