पिंप्राळा परिसरातून इन्व्हर्टर ,बॅटऱ्या लांबविल्या

0

जळगाव ;- शहरतोल पिंप्राळा परिसरातून चोरटयांनी इन्व्हहर्टर आणि बॅटऱ्या असा एकूण १३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जयेश सुभाष बारी वय ३८ रा. आनंदमंगल नगर हे ४ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्याने १० हजार किमतीची बॅटरी आणि ३ हजार रुपयांचे इंबेटर असा एकूण १३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी जयेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपस पोहेकॉ राजेश चव्हाण तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.