Facebook; व्हेरिफाइड अकाउंटसाठी मोजावे लागणार पैसे !

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या मालकीचे फेसबुक सर्वाचेच जीवनावश्यक अँप झाले आहे. सोबतच थोड्या दिवसांपूर्वीच एक महत्वपूर्ण निर्णय ट्विटर चे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी घेतला होता. आपला अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी पैसे मोजावे लागणार. म्हणून यूजर्स आक्रमक झाले होते. मात्र आता मार्क झुकरबर्गच्या फेसबुकबाबतच्या मोठ्या घोषणेनंतर आता फेसबुक यूजर्सनाही धक्का बसला आहे. होय, आता फेसबुकच्या ब्लू टीकसाठीसुद्धा पैसे मोजावे लागणार आहे. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपची  मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे.

सध्या या प्रीमियम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य देशातही सुरुवात होईल. (Facebook) वेबसाठी त्याची किंमत 11.99 डॉलर्स आणि ioS साठी त्याची किंमत 14.99 डॉलर्स (1241रुपये) एवढी असणार आहे.ट्विटरने नुकतीच त्याची ट्विटर ब्लू पेड सबस्क्रिप्शन सेवा लाँच केली आहे. त्यासाठी दरमहा यूजर्सना पेड सबस्क्रिप्शन प्लान घ्यायचा असल्यास 900 रुपये मोजावे लागतील. तर सगळ्यात कमी सबस्क्रिप्शन प्लान हा 650 रुपयांचा असून हा फक्त वेबसाठीच असणार आहे. आता ट्विटरनंतर फेसबुकसुद्धा सेवा पेड करण्यावर भर देताना दिसतेय. फेसबुकचा प्रीमियम प्लान हा ट्विटरपेक्षाही महागडा असल्याचे दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.