एरंडोल येथील कावड यात्रेतील मृत तिघांवर आज साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

एरंडोल येथील रहिवासी काल कावड यात्रे निमित्त गेलेल्या तीघ तरुणांचा रामेश्वर संगमावर नदीत तोल गेल्याने ते नदीच्या वाहत्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यात त्यांचा दुर्देवी अंत झाला होता.

आज दि २२ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अत्यंत शोकांकुल वातावरणात कासोदा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परवा कावड यात्रेत गेले, मात्र आज त्यांची अंत्ययात्रा मिघाली. ही घटना अतिशय अस्वस्थ करणारी होती. एकाच कुटुंबातील, एकाच परिसरातील तिघांच्या पार्थिवाचे अंत्ययात्रा नेण्याची दुर्भाग्य शिंपी परिवारावर दुःखद असे होते. सोमवारी हसत खेळत सोबत गेलेले, आज गावात असे होईल. हे कुणालाही वाटले नव्हते.

तिघं पार्थिव हे साडेबारा वाजेच्या सुमारास गावात पोहोचले. त्यानंतर एक वाजेला अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत आमदार चिमणराव पाटील तसेच शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळींसह गावकरी उपस्थित होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने श्रद्धांजली साठी एरंडोल बंद आवाहन करण्यात आले होते. त्यास साथ देत शहरातील व्यवसायिकांनी आपली दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवली होती. अक्षय शिंपी, पियुष शिंपी, सागर शिंपी यांच्या परिवाराला आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य दिल्याची माहिती दिली. या घटनेने एरंडोल शहरातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.