धक्कादायक; भारतीय तरुणीचा अमेरिकेत ड्युटी दरम्यान शिपवर मृत्यू…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारतीय तरुण तरुणींना परदेशात जाऊन नोकरी करण्याची संधी सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक जन तिकडे जाऊन नोकरी करणे पसंत करतात. मात्र अश्याच एक नोकरीसाठी गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत रॉयल कॅरेबीयन शिपवर कामावर असलेल्या नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथे राहणाऱ्या तरुणीचा अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुही भूषण राऊत असं या तरुणीचे नाव आहे.

पुढच्याचं महिन्यात ती गणपतीसाठी वसईत परतणार होती. मात्र काल सोमवारी अचानक तिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या तिचे पार्थिव शरीर अमेरिकेत असून ते भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.त्यानंतर वसईत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुहीच्या अश्या जाण्याने तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि वसईकरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.