विमानाला हवेतच लागली आग, 146 प्रवाशांना.. (व्हिडीओ )

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

146 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला अचानक आग लागल्याची घटना चीनमध्ये झाली. संपूर्ण केबिन धूराने भरून गेलं. इंजिनला आग लागल्यानंतर केबिनमध्ये भरलेल्या धुरामुळे विमानातील नऊ प्रवाशांची प्रकृती खालावली. चिनी विमान कंपनी ‘एअर चायना’च्या फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला. यानंतर अधिकाऱ्यांनी सिंगापूरच्या चांगी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करून विमान रिकामं केलं.

चांगी विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर चायना एअरबस -ए320 विमानात एकूण 146 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते. ते म्हणाले की, हे विमान चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडू शहरातून येत होतं. रविवारी दुपारी 4.15 वाजता चांगी विमानतळावर त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमानातील नऊ प्रवाशांना केबिनमध्ये धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच प्रवाशांना बाहेर काढताना काहींना किरकोळ दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं.

 

तसेच कार्गो होल्ड (सामान ठेवलेला भाग) आणि विमानाच्या टॉयलेटमध्ये धूर निघत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. एका प्रवाशाने चिनी मीडियाला सांगितलं की, धुरामुळे केबिनचे लाईट चालू-बंद होऊ लागले आणि काही प्रवासी त्यांच्या जागेवर उभे राहिले, त्यानंतर क्रू मेंबर्सने त्यांना धीर धरण्याचं आणि त्यांच्या जागेवर बसण्याचं आवाहन केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.