इलॉन मस्क यांच्या नावे सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इलॉन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्तेचे सर्वात मोठे नुकसान सहन करण्याचा ऐतिहासिक जागतिक विक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने याबाबत ट्विट करत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. ट्विटरशी केलेल्या करारानंतर अनेक गोष्टींवरून मस्क यांना ट्रोलही करण्यात आले होते. मस्कच्या नावे वैयक्तिक सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. मस्क यांचा वैयक्तिकरित्या सर्वाधिक नुकसान सहन करण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.

दिग्गज इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे सीईओ मस्क गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहेत. गेल्या वर्षी ट्विटर खरेदीचा करार केल्यापासून मस्कच्या एकूण संपत्तीत सातत्याने घट झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.