लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनेता रितेश देशमुख अभिनित आणि दिग्दर्शित ‘वेड’ या मराठी चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः उचलून धरले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करत असून गेल्या ११ दिवसांमध्ये ३५ कोटींहून अधिकच गल्ला कमावला आहे.
विशेष म्हणजे सैराटनंतर अशी कामगिरी करणारा हा दुसराच चित्रपट ठरला आहे. सैराटने ११ दिवसांमध्ये ४० कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे, ‘वेड’ने रितेशच्याच ‘लय भारी’ चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/1612702843282284544/photo/1
विशेष म्हणजे, एका दिवसामध्ये सर्वाधिक कमाईच्या बाबतीतही ‘वेड’ने सैराटलादेखील मागे टाकले. कारण, दुसऱ्या रविवारी ‘वेड’ या चित्रपटाने तब्बल ५.७० कोटींची कमाई केली. ‘वेड’ चित्रपटाने ११ दिवसांमध्ये ३५.७७ कोटींची कमाई करून ‘लय भारी’ला मागे टाकले. ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. यावेळी पहिल्याच तब्बल २.२५ कोटींचा गल्ला केला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात तब्बल २०.६७ कोटींची कमाई केली. लवकरच हा चित्रपट ५० कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.