एलॉन मस्क करणार ट्विटरच्या लोगोचा कायापालट?, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ट्विटरचा मालक एलॉन मस्क (Elon Musk) कधी काय करेल सांगता येत नाही. सातत्याने काहीतरी नवीन करणे हे त्याने जणू ठरवूनच घेतले आहे. Tesla आणि SpaceX चे सीईओ एलॉन मस्क हा त्याच्या हटके स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचा निर्णय त्याच्याच गळ्याशी येतांना आपण पहिले आहे. ट्विटरचा कारभार त्याने हातात घेतला खरा, पण त्याच्याच नाही तर कर्मचाऱ्यांच्या आणि युझर्सच्या डोक्याला एकदम ताप झाला. त्याने ट्विटरवर खूप सारे बदल केले. त्याचा मोठा फटका त्याला बसला आहे. एलॉन मस्कचे अजूनही कमी झाले नाहीये. ट्विटर आणि ट्विटरची चिमणीचा लवकरच कायापालट होणार आहे. एलॉन मस्कनेच या बद्दल माहिती दिली आहे.

काय होतील बदल?
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क याने ट्विटरचा डिफॉल्ट रंग बदलण्यासाठी ट्विट केले. लवकरच ट्विटर चा कायापालट होणार असून, चिमणी उडण्याची शक्यता आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच त्याने सांगितले कि आज रात्रीच एक शानदार लोगो तयार होईल आणि उद्या तो जगासमोर येई, असे त्याने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.