जळगाव :-येथील वायर असलेल्या एका विवाहितेचा तीन लाख रुपयांच्या मागणीसाठी छळ होत असल्याचा प्रकार ओळखीस आला असून या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
जळगाव शहरातील शाहू नगर येथील माहेर आसलेल्या विवाहिता स्वाती मनोज पाटील (वय-२४) यांचा विवाह मार्च २०१९ मध्ये डांभूर्णी येथील मनोज प्रेमचंद पाटील याच्याशी झालेला आहे. यानंतर विवाहितेला शुल्लक कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. हा प्रकार झाल्यानंतर व्यापार करण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान विवाहिते पैशांची पुर्तता न केल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावरील सर्व दागिने काढून दिले. शिवाय सासू, सासरे, जेठ जेठाणी आणि ननंद यांनी शारिरीक मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने माहेरी निघून आल्यानंतर शनिवारी २२ जुलै रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मनोज प्रेमचंद पाटील, सासू भारती प्रेमचंद पाटील, सासरे प्रेमचंद तुळशीराम पाटील, जेठ विवेक प्रेमचंद पाटील, जेठाणी तनुजा विवेका पाटील आणि नणंद पल्लवी योगेश पाटील सर्व रा. डांभूर्णी ता.यावल यांच्याविरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.

