“तुमची दाढी करून देतो पण मत द्या” (व्हिडीओ)

उमेदवाराने हाती घेतला वस्तरा

0

तमिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणूक तोंडावर अली असून उमेदवारांची घोषणा झाल्यापासून प्रचार प्रसार सुरु झाला आहे. जिंकण्यासाठी उमेदवार काय करतील हे सांगता येत नाही. मताधिक्य मिळवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जाऊन अश्वासन देताना आपण पाहिलंच असेल. मात्र एका उमेदवाराने प्रचारादरम्यान चक्क हाती वस्तारा घेत थेट मतदाराची दाढी करणं सुरू केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://x.com/ANI/status/1775916159306731806?s=20

तामिळनाडूच्या रामेश्वरमध्ये लोकसभेचा अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये न्हावी म्हणून लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा उमेदवार सलूनमध्ये आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत उमेदवार त्यांना चक्क हात जोडून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. या व्हिडिओला ७३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.