Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»कार्यक्षम गृहमंत्री फडणवीसांच्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर – एकनाथराव खडसे
    राजकारण

    कार्यक्षम गृहमंत्री फडणवीसांच्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर – एकनाथराव खडसे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 23, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेतून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यात गावठी कट्टे, गुटखा, गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्ह्यासह राज्यात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असून पोलीस यंत्रणेत खालपासून ते वरपर्यंत मोठी हप्तेखोरी आहे. कार्यक्षम गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कधी नव्हे तो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी लगावला आहे.

    ते पुढे म्हणाले की, वर्षभरापूर्वी राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदारांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी प्रेमामुळे केली की खोक्यांमुळे? हा प्रश्न आहे. बंडखोर आमदारांनीच खोक्यांचा विषय पुढे आणला. बंडखोरी करतांना आमदारांनी काही कारणे दिली. त्यात आमचा भागाचा विकास व्हावा म्हणून बंडखोरी केल्याचे प्रमुख कारण सांगण्यात आले. मग सत्तापरिवर्तनानंतर राज्यातील कुठल्या भागाचा विकास झाला. किमान जळगाव जिल्ह्याचा तरी विकास झाला का? असा सवाल आमदार खडसे यांनी उपस्थित केला.

    राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारा झाला असल्याची टीका आमदार एकनाथराव खडसे यांनी केली. उमर्टी या छोट्याशा गावातून गावठी कट्ट्यांची तस्करी केली जाते. हे माहित असूनही कार्यक्षम असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याकडे लक्ष देत नाही. उमर्टीत कारवाई का होत नाही? हे रहस्य न उलगडणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

    केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण आहे. या योजनेत बोदवड तालुक्यातील 44 गावांचा समावेश असून भूजल विभागाने याठिकाणी पाण्याचे स्त्रोत असल्याचा दाखला दिला आहे. प्रत्यक्षात तिथे कुठेही पाणी नाही. मग योजना राबविण्यासाठी टेंडर निघाले कसे? योजना राबविलीच कशी जाते? याची चौकशी झाली पाहिजे असेही आ. खडसे यांनी सांगितले.

    #maharashtra #politics Deputy Chief Minister Devendra Fadnavis Eknathrao Khadse jalgaon Jlgaon Jilha
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif