Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»धरणगाव येथे समविचारी संस्था, संघटना व पक्षांची संवाद बैठक संपन्न…
    राजकारण

    धरणगाव येथे समविचारी संस्था, संघटना व पक्षांची संवाद बैठक संपन्न…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 23, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    येथील बिजासनी जिंनिग प्रेसींग येथे समविचारी संस्था, सामाजिक संघटना व विविध पक्ष यांची आज रोजी संवाद बैठक संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक रणजित शिकरवार यांनी केले. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, प्रा.करीम सालार, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, मोहन शिंदे, राम पवार, सुरेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, फारुक शेख, राजेंद्र वाघ, दिपक वाघमारे, रतीलाल चौधरी, योगेश पाटील उपस्थित होते.

    उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सध्याची महागाई, बेरोजगारी आणि जगण्याचे प्रश्नाचे स्वैर खाजगीकरण यामुळे कष्टकरी – शेतकरी व मध्यम वर्गाचे रोजचे जगणे अवघड होत चालले आहे. शेतकऱ्याचा मालाला हमी भाव न देणे, १४ जिल्हयातील वंचितांचे रेशन बंद करणे, बेरोजगारी, महागाई, कामगार कायदा सारखा क्रांतीकारी कायदा खिळखिळा करणे, ईव्हीम ऐवजी बॅलेटवर निवडणुका घेणे, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण यासारखे मुद्दे जाणून बुजून निर्णय न लावणे, ओबीसींचे जातीनिहाय जनगणना न करणे, आदिवासी, ओबीसी वस्तीगृह, स्वाधार योजना, बहुजनांचे प्रश्न, बहुजनांना मुसलमानांच्या विरोधात पेटविणे, जाती-धर्मात तेढ निर्माण करणे, मूळ प्रश्न दाबून ठेवणे आणि धार्मिक दिशाभूल करणे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची उघड पायमल्ली होत आहे. पोलिसांसह प्रशासनावर दबाव चंद्राच्या वापर करणे, जाती धर्मावर राजकारण समाजासाठी मारक, अश्या अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

    याप्रसंगी जयदीप पाटील, नंदू पाटील, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, गोरख देशमुख, दिनेश भदाणे, राजेंद्र ठाकरे, सुनील सोनार, संतोष महाजन, लीलाधर पाटील, विजय पाटील, किरण अग्निहोत्री, गोपाल पाटील, भीमा धनगर, छोटू चौधरी, दिनेश पाटील, विलास पवार, गजानन महाजन, गौतम गजरे, नदीम काझी, इरफान शेख, विनोद रोकडे, देवानंद चव्हाण, फारुक शेख मास्टर, आयाज शेख, नगर मोमीन, बापू महाजन, विक्रम पाटील, गोपाल आण्णा माळी, राहुल रोकडे यांच्यासह सर्व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी, पुरोगामी पक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी पाटील यांनी तर आभार निलेश चौधरी यांनी मानले.

    #politics Dharangaon jalgaon Jalgaon Gramin
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif