एकनाथ खडसेंचा मोठा दावा, शरद पवारांना सोडण्यासाठी ऑफर..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठे विधान केले आहे. भाजपकडून आपल्याला मोठी ऑफर आहे. तसेच  शरद पवार यांना सोडण्यासाठी अजित पवार गटाच्या दोन मोठ्या नेत्यांनी आपल्याला फोन केले असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.

 एकनाथ खडसे काय म्हणाले ?

एकनाथ खडसे म्हणाले की, मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारण्यात आले होते. शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात येण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचाही मला फोन आला होता, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र, मी कोणत्याही परिस्थिती शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपकडून ऑफर ?

मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी मी उतावीळ असल्याचा गिरीश महाजन यांचा आरोप चुकीचा असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. उलट भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांनी मलाच भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.