तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावाची सुरुवातच खराब; खडसेंची पालकमंत्र्यांवर टीका

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

“या मतदार संघातील जनतेने मला गेली तीस वर्ष भरभरून प्रेम दिलं, पक्षाला शुन्यातून भरभराटीकडे नेले. मला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात विकासाच्या दृष्टीने ओळख असलेला मी.. डाकु कसा ?” असा सवाल करीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्ता मेळावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली.

मुक्ताईनगर मतदार संघात पुर्वी वरणगावचा समावेश असल्याने पंधरावर्ष व विभाजन झाल्यानतंर पंधरा वर्ष असे तीस वर्ष जनतेचे प्रतिनिधीत्व करून या परिसरात विकास कामे केली. मोठ्या प्रमाणात सिंचनाचे काम केल्याने जनता पाठीशी खंबीर उभी राहीली. मतदारसंघ सोडून जिल्ह्यातील अजंनी धरणाचे काम केले. धरणगावची विकास कामे करीत सत्ता स्थापन केली. एरंडोलमध्ये सत्ता आणली. जनतेत विकासाच्या दृष्टीने ओळख असलेला नेता म्हणून माझी ओळख आहे. तर मी डाकु कसा असा सवाल उपस्थित करीत हा मतदार संघातील जनतेचा अपमान केला आहे.

जिल्ह्यात माझ्या विरोधात सर्वच पक्षाचे नेते एकवटले असले तरी मी पुरुन उरेल मला चारी मुड्या चित केल्याशिवाय नाव लावणार नाही असे असेल तर तुम्ही नावच लावू नका कारण तुमच्या नावाची सुरुवातच खराब अक्षराने होत आहे अशी टिका नाव न घेता एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केली.

आधी मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाची जिह्यात ओळख निर्माण करून पक्षाला भरभराटीकडे नेले, आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामही पुर्ण ताकदीने आपण करू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे बोलताना पुढे म्हणाले की, नुसता झेंडा फडकेल असे म्हणून चालणार नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहून मेहनत घेतली पाहीजे, तेव्हाच नगरपरिषदेवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकेल असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने राहण्याचा सल्ला देत नाथाभाऊ सोबत असल्याने पक्षाची ताकद वाढली असुन येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल, त्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड रविद्र भैया पाटील यांच्या हस्ते युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी मंचावर युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, उपाध्यक्ष राजेद्र चौधरी, वाय. आर. पाटील, दिपक मराठे, सुधाकर जावळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.