व. वा. वाचनालयातर्फे महिला दिनानिमित्त पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील वल्लभदास वालजी वाचनालय यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांनी अनेक कार्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. तसेच त्यांच्या जीवनातील अनुभव सुद्धा त्यांनी शब्दबद्ध केले आहे, अशी अनेक चरित्रे आणि आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. आपण अशा एका पुस्तकाची निवड करा आणि त्याबद्दल हजार ते तीन हजार शब्दांमध्ये लिहून 8 मार्च 2022 पर्यंत वाचनालयामध्ये पोचवा.

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तक मराठीत असले पाहिजे आणि लेखनही मराठीतच केले पाहिजे. या स्पर्धेसाठी वयाची मर्यादा नाही. या स्पर्धेसाठी अनुवाद केलेले पुस्तक सुद्धा घेता येणार आहे. या स्पर्धेत महिला किंवा पुरुष सहभाग घेवू शकतात. पुस्तकाचे लेखक महिला किंवा पुरुष असू शकतात. मात्र पुस्तक हे महिलांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यातून मिळणारी प्रेरणा, त्यातून आपल्याला काय शिकता येईल या संदर्भामध्ये आपण पुस्तक परिचय स्पर्धेमध्ये लिहायचे आहे.

यासाठी एका स्वतंत्र कागदावर आपले नाव, पत्ता, संपर्कासाठी मोबाईल नंबर, जर महाविद्यालयात शिकत असाल तर महाविद्यालयाचे नाव आणि आपले वय अशी माहिती लिहायची आहे. तसेच जे पुस्तक परीक्षण आपण पाठवणार आहात तिथे पुस्तकाचे नाव आणि प्रकाशकाचे नाव याचा उल्लेख जरूर करावा.

यानिमित्ताने विविध कार्यक्षेत्रामध्ये महिलांनी केलेल्या कामाचा आढावा आणि आठवणींना उजाळा मिळेल. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वल्लभदास वालजी वाचनालय आपणासाठी चांगले सजग वाचक होण्याची प्रेरणा आणि त्यातून लेखक घडवण्याचे एक संधी यानिमित्ताने देणार आहे.

महिला दिनानिमित्त महिलांच्या चरित्रात्मक आत्मचरित्रात्मक पुस्तकांच्या परिक्षणाची ही स्पर्धा असून त्यामध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्या स्पर्धकांना आपण पारितोषिक देणार आहोत. प्रथम पारितोषिक पाचशे रुपये, द्वितीय पारितोषिक तीनशे रुपये आणि तृतीय पारितोषिक दोनशे रुपये आहे. चांगले लेखन करून पारितोषिक जिंकण्याची संधी आपणा सर्वांना आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने चांगली पुस्तके आपल्याकडून वाचली जातील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. या स्पर्धेची माहिती इतरांना सांगून त्यातून अधिकाधिक महिलांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल सर्वांपर्यंत आपण पोहचवू शकू.

पुस्तक परिचय स्पर्धेसाठी आपण हस्तलिखित किंवा कॉम्प्युटरवर टाईप करून आपले लेखन पाठवा. सदर लेखन कार्यालयीन वेळेत सोमवार व्यतिरिक्त सकाळी साडेआठ ते साडेअकरा आणि संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळामध्ये जमा करावे. या स्पर्धेत अधिकाधिक जणांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचनालयामधील ग्रंथपालांशी संपर्क करू शकता किंवा या स्पर्धेचे निमंत्रण प्राध्यापक डॉ. शुभदा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा

व वा वाचनालय = 02572225824
अनिल अत्रे = 9404053571
डॉ. शुभदा कुलकर्णी = 9423973141

Leave A Reply

Your email address will not be published.