पुण्यात कोविशिल्डचे 1 लाख 41 हजार डोस शिल्लक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे; कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात येणार्‍या शहरातील 111 खासगी हॉस्पिटलपैकी 47 हॉस्पिटलकडे 1 लाख 41 हजार डोस शिल्लक असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने हॉस्पिटलकडून कोविशिल्ड लसीचे किती डोस शिल्लक आहेत याची माहिती मागवली होती. त्यानुसार 47 हॉस्पिटलनी ही माहिती दिली आहे.

शहरातील हॉस्पिटलकडे लसीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असून त्याची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे डोस बदलून मिळावेत, अशी मागणी हॉस्पिटलकडून आरोग्य यंत्रणेकडे तसेच सीरम इन्स्टिट्यूटकडे करण्यात आली होती.

या मागणीनंतर राज्य आरोग्य खात्याने खासगी हॉस्पिटलमध्ये कोविशिल्डचे किती डोस शिल्लक आहेत याची माहिती गोळा करण्याचे आदेश जिल्हा व महापालिका आरोग्य यंत्रणेला दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने ही माहिती खासगी हॉस्पिटलकडून मागवली आहे. ती माहिती राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील 37 हॉस्पिटलनी त्यांच्याकडे 20 पासून 1 लाख 9 हजार इतके डोस शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वाधिक डोस हे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये असून त्यांची संख्या 1 लाख 9 हजार इतकी आहे. या डोसची मुदत 5 मार्चपर्यंत आहे. तसेच वाडिया हॉस्पिटल, रुबी हॉल व भारती हॉस्पिटलकडेही हजारो डोस शिल्लक आहेत.

शहरातील स्थिती

लसीकरण करणारी खासगी हॉस्पिटल : 117

शिल्लक लसीबाबत माहिती दिलेली हॉस्पिटल : 47

बहुतांश डोसची मुदत : 5 मार्चपर्यंत

 

Leave A Reply

Your email address will not be published.