मजुरीच्या वादात अडीच वर्षाची मुलगी पडली पेटत्या विस्तवात

0

लोकशाही न्युज नेटवर्क

भंडारा; मजुरी मागण्यासाठी गेलेल्या मजुराला मजूरी न देता त्याला धक्काबुक्की करण्यात आली. तेव्हा आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला कडेत घेऊन मध्यस्थी करण्यास गेलेल्या मजुराच्या पत्नीलाही धक्काबुकी करण्यात आली. तिच्या कडेतील मुलगी पेटत्या विस्तवात पडल्याने भाजली. ही घटना साकोली तालुक्यातील घानोड येथे (दि. २०) ला घडली. (दि.२१) साकोली पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Bhandara)

मदरसा आणि वैदिक पाठशाळांना शिक्षण अधिकार कायद्यात आणावे : दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

मंगल बडोले (४५) आणि समीर डोंगरवार (२५) रा. घानोड अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अजित पतीराम टेंभूर्णे (३२) रा. घानोड हा २० फेब्रुवारी रोजी पत्नी व अडीच वर्षीय मुलीला घेऊन मजुरीचे पैसे मागण्यासाठी मंगल बडोले याच्याकडे गेला होता. तेव्हा मंगलने ‘कशाचे पैसे?, तुझे पैसे देत नाही’ असे बोलून मजुरी देण्यास नकार दिला.

त्यानंतर मंगल आणि समीर डोंगरवार या दोघांनी अजितला धक्काबुक्की करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिथे हजर असलेली अजितची पत्नी मुलीला घेऊन त्यांना थांबविण्यास गेली असता मंगलने तिलाही धक्काबुक्की केली. त्यामुळे तिच्या कडेवरून मुलगी निसटली आणि जवळच पेटत असलेल्या विस्तवात पडली. (Bhandara)

त्यामुळे मुलीचा हात आणि कान भाजला गेला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर अजितला जीवानिशी मारण्याची धमकी दिली. अजितने या घटनेची तक्रार साकोली पोलिसात केली. पोलिसांनी मंगल बडोले आणि समीर डोंगरवार या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.