ब्रेकिंग ! अखेर खडसेंची घरवापसी, आज ठरणार मुहूर्त ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच एकनाथ खडसे यांनी नुकतीच दिल्लीचा दौरा करून  केंद्रीय स्तरावरील भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र या चर्चांना खडसेंनी फेटाळून लावत माझा सध्या तरी असा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु आता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून त्यांनी स्वत:च आपण भाजपमध्ये जात असल्याचं सांगितलं आहे. खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार, यावर आज सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपमधून पक्षांतर करून राष्ट्रवादीत आलेले खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याने हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभेच्या जास्ती जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात चांगलेच कंबर कसले आहे.  त्यातच  उत्तर महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क असलेल्या एकनाथ खडसे यांना सोबत घेतल्यास जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल, असा  भाजप नेतृत्वाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. याच पाश्वभूमीवर आता खडसे देखील भाजप श्रेष्ठींच्या भेटी घेत असल्याने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.