खडसे सुनेविरुद्ध मैदानात उतरणार ?, खडसेंची घोषणा..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीचे आतापासून वारे वाहायला लागले आहेत. त्यातच एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी 2024 लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. एकनाथराव खडसे एकेकाळी भाजपचे दिग्गज नेते होते. मात्र नंतर देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांनी पक्षाने संधी दिल्यास आपण लोकसभा लढायला तयार आहोत, असे म्हणत एकप्रकारे आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.

सून विरुद्ध सासरे लढत

पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. विशेष म्हणजे रावेर मतदारसंघातून सध्या खडसे यांची सून रक्षा खडसे या खासदार आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असली तरी त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपमध्येच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने एकनाथ खडसे यांना रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यास 2024मध्ये रावेरमध्ये सून विरुद्ध सासरे अशी लढत बघायला मिळू शकते. तसेच जळगाव सभेत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या लोकसभा लढण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. या वृत्तामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.