राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

0

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

लोकशाही संपादकीय लेख

 

अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडली फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. एकाच दिवशी मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन झाले. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अमळनेरचे अनिल भाईदास पाटील हे गेले दोन दिवस जळगाव जिल्ह्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन येत्या महिला दीड महिना महिन्यात चार पटीने वाढणार असल्याचा आत्मविश्वास मंत्री अनिल पाटलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच जळगाव शहर मध्यवर्ती ठिकाणी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयाचा लवकर ताबा घेतला जाईल, असेही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यालय हे माजी खासदार ईश्वर बाबू जैन यांच्या खाजगी मालकीचे असल्याने ते कार्यालय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपूर्त करणार असल्याचे मंत्री अनिल पाटलांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला ईश्वर बाबू जैन यांचे सुपुत्र मनीष जैन हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी पत्रकांनी मनीष जैन यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बद्दल त्यांची भूमिका काय? असे विचारले असता, मंत्री महोदयांनी याबाबत सांगितले आहे असे म्हणून याबाबत भाष्य करण्यास नकार देऊन काढता पाय घेतला. महाराष्ट्रातील काही जिल्हा कार्यालय अजित पवार गटाने ताब्यात घेतले असले तरी जळगावच्या कार्यालयावर ते ताबा मिळवू शकत नाही, असा दावा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील यांनी केला. तसेच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शरद पवार यांचे सोबत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. तसेच माजी खासदार ईश्वर बाबू जैन यांनी शरद पवारांनाच समर्थन दिले असल्याचे ॲड रवींद्र भैय्या पाटील यांनी स्पष्ट केले. सध्या माजी खासदार ईश्वर बाबू जैन हे आजारी असल्याने आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे ते विश्रांती घेत आहे. लवकरच त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात भूमिका स्पष्ट होईल. ईश्वर बाबू जैन शरद पवारांचे सुरुवातीपासूनच कट्टर समर्थक आहेत. शरद पवारांमुळेच ते खासदार बनले. परंतु ईश्वर बाबू जैन यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसताना मात्र, त्यांचे समोर सुपुत्र माजी आमदार मनीष जैन यांनी मात्र अजित पवारांना आपले समर्थन दिले असून अजित पवारांनी उमेदवारी दिली तर रावेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जोमाने लढण्यास तयार आहे, हेही सांगून टाकले. यामुळे ईश्वर बाबू जैन आणि त्यांचे सुपुत्र मनीष जैन या पिता-पुत्रांमध्ये शरद पवार की अजित पवार या समर्थनाबाबत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

विधानसभा निवडणुकीला अद्याप सव्वा-दीड वर्षाचा कालावधी असून मनीष जैन यांना विधानसभा लढवायचीच असेल तर रावेर मधून न लढवता त्यांनी आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा टोला ऍड रवींद्र भैय्या पाटील यांनी मारला आहे. त्याचबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतलेले अनिल भाईदास पाटील मंत्री पदाची शपथ घेण्याआधी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या कापसाला भावासंदर्भात, कांद्याच्या भावासंदर्भात, तसेच अमळनेरच्या विकास विभागीय महसूल कार्यालय कार्यालयाच्या जागेसंदर्भात आंदोलन करून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला होता. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याने विधान विकासाच्या प्रश्नांचा बाधा निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आता मंत्रि बनलेल्या अनिल पाटलांची भूमिका मंत्रिपदाच्या शपथेनंतर लगेच बदलल्याने जळगाव जिल्ह्यातील जनतेत संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे. शेतकऱ्यांच्या समस्या वाढती महागाई आदींबाबत प्रश्नांना लगेच बगल दिली जाऊन राष्ट्रवादी पक्ष संघटना चार-पाटीने वाढवणार, राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात पूर्व वैभव प्राप्त करणार याबाबत जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला देणे घेणे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा जिल्ह्यातील प्रलंबित विकास प्रकल्पांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात पुढाकार घेणे हे जिल्ह्याच्या हिताचे राहील. जिल्ह्यातील पाडळसे धरणाबरोबरच बोदवड सिंचन प्रकल्प गिरणीतील बलून बंधाराच्या रखडलेला प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार, याबाबत मंत्री अनिल पाटलांनी काही भाष्य केले असते तर जिल्ह्याच्या विकासासाठी खरोखर तळमळ आहे, असे स्पष्ट दिसून आले असते. नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटलांकडून जिल्हा वासियांनी ही अपेक्षा करणे गैर नाही. अन्यथा दोन ऐवजी जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले असल्याचा आनंद असला तरी तिन्ही मंत्र्यांमध्ये समन्वय साधला जाईल का? हा प्रश्न मात्र भेडसावणारच कच राहील…!

Leave A Reply

Your email address will not be published.