कोण जिंकले, कोण हरले..!

0

लोकशाही विशेष अग्रलेख 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळले. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी चाळीस आमदारांसह भाजपशी (BJP) हात मिळवणी करून सरकार स्थापन केले. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट दिले. शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) अस्तित्वात येऊन तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. दरम्यान शिवसेना (Shivsena) चिन्हासह पक्षाचे नाव गोठवले गेले. आमची शिवसेना खरी, असा दावा उद्धव ठाकरे तसेच शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे.

दरम्यान शिवसेनेचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे (Dasara Melava) झाले. अडथळ्यांची शर्यत पार करून उद्धव ठाकरेंचा शिवतीर्थावर जोरदार मेळावा झाला. शिंदेंच्या बीकेसी मैदानावर खेचून आणलेली गर्दी होती, तर शिवतीर्थावर निष्ठावान दर्दी शिवासैनिकांची गर्दी होती. बीकेसीला ओढून आणलेली तर शिवतीर्थावर उत्स्फूर्त गर्दी होती. भाषणात सुद्धा उद्धव ठाकरेंनी बाजी मारली. याच मेळाव्यात नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उपनेते सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे भाषण गाजले.

अंधाऱ्यांच्या भाषणाने शिवसैनिकात उत्साह संचारला होता. त्याचाच एक भाग म्हणून मूळ शिवसैनिकांत तसेच शिवसेनेवर प्रेम करणाऱ्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारचा अन्याया विरोधात हल्लाबोल करण्यासाठी दिनांक 9 ऑक्टोबर पासून सुषमा अंधारे यांचा नेतृत्वात महाप्रबोधन यात्रेला (MahaPrabodhan Yatra) शिंदे यांचा गड समजल्या जाणाऱ्या ठाण्यापासून सुरुवात झाली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) मिमिक्री केली म्हणून सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तीन आठवडे महाप्रबोधन यात्रा शांततेत पार पडली. परंतु दिनांक १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांच्या मतदारसंघात अंधारेंच्या पाच सभांचे आयोजन करण्यात आले होते.

यातली पहिली सभा शिंदे सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांच्या मतदार संघातील धरणगाव या तालुक्यात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री गुलाबराव देवकरही या सभेला व्यासपीठावर उपस्थित होते हे विशेष. सुषमा अंधारे यांनी गुलाबरावांवर प्रश्नांचा भडीमार केला. स्वतःच्या मतदारसंघात धरणगावात वीस दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळते, तरीसुद्धा त्यांना पाणीदार पाणीपुरवठा मंत्री म्हणून संबोधले, याचे कारण काय? असा सवाल करून हे पाणीदार पाणीपुरवठा मंत्री सायंकाळी ग्लास भरण्यासाठी पाणी देतात, असा टोला सुषमा अंधारे यांनी मारला.

सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरेंकडून उद्धव आदित्य ठाकरेंवर यापूर्वी जाहीर टीका केली आहे. शिवसेनेत तीन महिन्यापूर्वीच आलेले हे तीन महिन्याचे बाळ असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी अंधारांवर केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बद्दल टीकाकारांना पाझर फुटला म्हणून उद्धव ठाकरेंच्या साथीला आली. परंतु गेले तीस वर्षे शिवसेनेत राहून कमाई करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोपच अंधाऱ्यांनी गुलाबराव केला. मला तीन महिन्याच्या बाळाची उपमा गुलाबराव यांनी दिली. त्यामुळे बाळांना त्यांना लाथा चापट्या मारण्याचा अधिकार आहे, असा पलटवार अंधारे यांनी केला. एकंदरीत धरणगावची सभा गाजली. त्यातच शिवसेनेतर्फे शरद कोळी यांचे गुलाबरावांवर जोरदार टीकास्त्र करणारे भाषण झाले. धरणगावच्या सभेनंतर पाचोरा एरंडोल आणि चोपडा येथील सभा ही गाजल्या. दरम्यान प्रक्षोभक भाषणात केले म्हणून शरद कोळींवर पोलिसांचा ससे मिरा लागला.

पहिल्यांदा सभेत भाषण करण्याची संधी घालवण्यात आली. त्यानंतर प्रक्षोभक भाषण केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर शरद कोळी यांना जळगाव जिल्हा बंदी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकात उत्साह संचारला. त्यातच दिनांक ४ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगरच्या सभेवर बंदी घालण्यात आली. महाप्रबोधन यात्रेच्या सभेच्या ठिकाणी उभारण्यात आलेले व्यासपीठ पोलिसांनी हटवले. मुक्ताईनगरच्या सभेला जाण्यापासून सुषमा अंधारेंना पोलिसांनी रोखले. अंधारींना नजर कैद ठेवण्यात आले. ज्या के. पी. प्राइड हॉटेलमध्ये अंधारे थांबल्या होत्या, तेथे शेकडो पोलिसांचा गराडा घातला गेला.

दरम्यान मुक्ताईनगर मध्ये शिवसैनिकांची धरपकड सुरू झाली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. अंधारे मुक्ताईनगरला जाऊ शकल्या नाहीत. त्यांनी ऑनलाईन सभा घेतली आणि या ऑनलाइन सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोके घेत असल्याचा आरोप अंधारेंनी केला. तुम्ही कितीही खोके घेतले तरी तुम्ही कंगाल आहात. माझी सभा रद्द केल्याबद्दल गुलाबरावांचे आभार माना. कारण सभा झाली असती तर त्यांचे वाभाडे निघाले असते, तरीसुद्धा ऑनलाइन सभेला मिळालेल्या प्रतिसादाने मी जिंकले आणि आपण हरले आहात. कोंबडं झाकलं म्हणून दिवस उगवायचे थांबत नाही. असे त्या म्हणाल्या.

पाटील हे शिवसेनेतील धडाकेबाज मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जातात तथापि सुषमा अंधारे यांचे भाषण गुलाबराव पाटलांपेक्षा सरस होते, असा जिल्ह्यात मतप्रवाह दिसून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.