विधानपरिषदेचे सत्तासमीकरण …

0

राज्यात आज राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असून शिवसेनेने  मोठा बाजार रोखण्यासाठी व्हीप जारी केला आहे. 163 मतांचा जादुई आकडा काय करामत करतो या विषयीचे  चित्र आज रात्रीच स्पष्ट होईल. विविध पक्षाचे आमदार आपल्याला नेत्यांच्या डावणीत डेरेदाखल झाले आहेत.

राज्यातील 10 विधान परिषदेचे सदस्य जे आज मंत्रीमंडळात आहेत त्यांची निवृत्ती व नव्या आमदारांचा शपथविधी सोहळा लवकरच पार पडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जे सदानकदा उघडा  कोट काळी संघाची टोपी घालून राजभवनात आपण संघाचे निष्ठावंत पाईक असल्याचे मिरवतात त्यांचे समोर विधानपरिषदेतील नवनिर्वाचीत आमदारांचा शपथ विधी होईल. बहुचर्चीत राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी भारतभर ख्यातकिर्त आहेत. असो राज्यसभा निवडणुक महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर असतांना 1 उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रुपाने जास्त दिल्यामुळे ही निवडणुक बिनविरोध न होता जुंपली आहे. आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व पक्षाचे नेते या कामात आजतरी व्यस्त आहेत.

विधानसभेच्या 287 आमदारांनी 10 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. भारतीय जनता पक्षाने 5 आमदारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडून मंजूर करुन आणली आहे.  या यादीतील नवे चेहरे हे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत. यात एक गोभ आहे. पक्षाने माजी मंत्री व गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना मानं  वेट ॲड वॉच म्हणून ठेवले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय व प्रसाद लाढ आणि महिला प्रतिनिधी म्हणून उमा खापरे यांची उमेदवारी घोषीत केली आहे.

भा.ज.प. आपल्या कोटयातून 4 जागा सहज निवडूण आणु शकली असती परंतु पक्षाला रसद पुरविणारे व फडणवीसांचे विश्वासू  म्हणून बळ देणारे प्रसाद लाड हे प्रसादाविना वंचीत राहिले असते ? या लाड यांना निवडून आणण्यासाठी भा.ज.प.ला खटपट करावीच लागणार आहे. 27 मतांचा कोटा भा.ज.प. साठी निश्चित करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे प्रत्येकी दोन प्रमाणे 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेस कडून चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने सचिन अहिर व आदिवासी चेहरा म्हणून आमशा  पाडवींना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसने बहुप्रतिक्षित माजी मंत्री एकनाथराव खडसे व रामराजेनाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीला 162 हा आकडा शेवटपर्यंत पार करायचा आहे. दोन आमदार माजीमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांचा मतदानाबाबतचा निर्णय कोर्टात आहे.

विधान परिषदेतून का होईना आपल्याला विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात जाता येईल म्हणून अनेकांनी गणपती पाण्यात टाकून ठेवले होते. अखेर त्यांची झोळी रिकामी राहिली. गोपीनाथराव मुंडेंच्या लढवैय्या कन्या पंकजा मुंडे यांना पक्षाने बेदखल केले. भा.ज.प. मधील निष्ठावंतांना डावलून त्यांना थांबायला सांगीतले ते घटक पक्षातील राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे, यांनाही विश्राांतीचा सल्ला देण्यात आला आहे. या सोबत पक्षातील बोलबच्चन [प्रवक्ते] केशव  उपाध्ये, माधव भंडारी, रा. काँ. पक्षाचे महेश तपासे, शिवसेना  महिला प्रवक्त्या मनिष कायंदे यांनाही ‘थोडं थांबा की’, असा घरचा आहेर दिला आहे.

विधान परिषदेची निवडणुक ही आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते. हया नव्या चेहऱ्यांना मंत्री मंडळात स्थान देतांना आगामी राजकीय स्थितीचा मागोवा घेतला जातो. धूर्त व मातब्बर मुख्यमंत्री त्यांचा जोडीला देशाचे नेतृत्व करणारे शेतकऱ्यांचे नेते रा.कॉ. पक्षाचे सर्वेसर्वा मा. खा. शरदराव पवार, काँग्रेसचे तरुण नेतृत्व बाळासाहेब थोरात नाना पटोले या सर्वांनी मिळून हा जगन्नाथाचा रथ हाकायचा अधिकार महाराष्ट्राच्या जनेते दिला आहे. खान्देश  विकासपुरुष पक्षाचे निष्ठावंत पाईक ईडीने ते सी. डी. पर्यंत सर्वांना पुरून उरणारे मा. एकनाथराव खडसे उर्फ नाथाभाऊ आपण या निवडणुकीत निवडुन या येतांना मात्र आमच्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होतील असं मंत्रीपदही आपण सोबत आणा व होऊ द्या एकदाचा चौफेर विकास, याच आपणास सदिच्छा..!

Leave A Reply

Your email address will not be published.