अवैध शस्त्र बाळगणारा गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाणे वाढले आहे. त्याबाबत शोध घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिले होते.

यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोह सुधाकर अंभारे, पोह महेश महाजन, पोना विजय पाटील, पोना प्रितम पाटील, पोकॉ सचिन महाजन, पोकों पंकज शिंदे यांचे पथक नेमण्यात आले होते .

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात राहणारा अश्विन हिरे एक गावठी पिस्तोल बाळगत असून शहरात दहशत करीत आहे. त्यावरुन सदर पथकाने अश्विन विजय हिरे (वय २०, रा. खंडेराव नगर, जळगाव) यास ताब्यात घेवून त्याच्याकडील १ गावठी बनावटीची पिस्तोल ३०००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अश्विन हिरे याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.