पेनड्राईव्ह बॉम्बचे जळगाव कनेक्शन ?

0

जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या खटल्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासंदर्भात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तपासी पोलिसांना हाताशी धरून खोटा बनाव केला. त्यासाठी ॲड. प्रवीण चव्हाण यांचे त्यांच्या पुणे कार्यालयात जे स्ट्रिंग ऑपरेशन केले गेले त्यामागे जळगाव येथील तेजस मोरे यांचा हात असल्याचा आरोप सहकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

कोण आहे हा तेजस मोरे ?

जळगाव जि.प.त तेजस मोरेचे वडील सर्व्हिसला होते. जळगावच्या जिल्हा परिषद कॉलनीत त्याचे घर आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या घरात मोरे कुटुंबियांचे कोणीच राहत नाही. हे घर भाड्याने दिलेले आहे. तेजस मोरे हा बांधकाम व्यावसायिक होता. तो पुणे येथे वास्तव्याला असतो. तेजसला एका गुन्ह्यात अटक झाली असतांना तेजस मोरे यांनी जामीन मिळावा म्हणून ॲड. प्रवीण चव्हाण यांचेकडे गेला. त्याला त्या गुन्ह्यात जामीन मिळाला. तो जामीनावर सुटल्यानंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांचेकडे जाणे येणेे सुरू झाले. त्यावेळी तेजस मोरे यांनी ॲड. चव्हाण यांना एसी, एलईडी, टीव्ही भेट म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्याला चव्हाणांनी नाकारले. तरी सुध्दा एक भिंतीवर लावण्याचे घड्याळ त्यांनी चव्हाणांना दिले आणि ते घड्याळ चव्हाण यांच्या कार्यालयात भिंतीवर अगदी चव्हाण ज्या टेबलावर बसतात त्याचे समोर लावले. इतकेच नव्हे तर हे घड्याळ खराब झाले म्हणून ते बाहेर दुरूस्तीलाही या तेजस मोरेंनी नेले आणि दुरूस्त करून पुन्हा त्याच ठिकाणी ते लावले.

कदाचित त्या घड्याळात कॅमेरा लावलेला असावा आणि त्याद्वारे तेजस मोरे यांनी ते स्ट्रिंग ऑपरेशन केले असावे असे खुद्द ॲड प्रवीण चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले. तरी सुध्दा हे केलेले स्ट्रिंग ऑपरेशन बनावट आहे. मी काहीही बोललो नसतांना एडीट करून ते दाखवण्यात आले आहे. त्यामुळे फॉरेन्सिक तपासणीतून सत्य बाहेर येणार आहे असे ॲड. प्रवीण चव्हाण हे आपल्या विधानावर ठाम आहेत. ॲड चव्हाण यांनी तेजस मोरेचे नाव घेतले असेल तरी या प्रकरणात एकटा तेजस मोरे करणे शक्य नाही. त्यात पुणे येथील एक माजी पत्रकार आणि पोलिस खात्यातील एक कॉन्स्टेबलचा हात असल्याचे कळते. ॲड. प्रवीण चव्हाण यांनी स्ट्रिंग ऑपरेशनच्या मागे तेजस मोरे असल्याचा आरोप केला असला तरी तेजस मोरेंनी मात्र ॲड. प्रवीण चव्हाण यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ॲड. प्रवीण चव्हाण हे पूर्णत: माझे नाव जोडून खोटे बोलत आहेत. माझा त्या स्ट्रिंग ऑपरेशनशची काहीही संबंध नसल्याचे सांगून तेजस मोरेने हात वर केले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोटे पुरावे करण्यात सरकारी वकिलाचा हात असून ते साहेबांसाठी केल्याचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्याने या पेनड्राईवची तपासणी होईल तेव्हा होईल परंतु आज मितीला मात्र ॲड. चव्हाण यांचा पर्दाफाश फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बने केलेला आहे. त्याचबरोबर याची चौकशी महाराष्ट्र पोलिसांकडे नव्हे तर सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी फडणवीस आणि त्यांचा भाजप पक्ष करीत आहे. त्यामुळे त्यांची लढाई चौकशीच्या एजंसीवरून पुढे चालूच राहणार आहे. त्याचा परिणाम आजमितीला ॲड. प्रवीण चव्हाण यांची प्रतिमा मलिन होत असतांना तत्कालिन गृहमंत्री कै. आर.आर. आबा पाटील यांचे माध्यमातून हा खटला पुनर्जिवीत करून यातील फिर्यादी कै. नरेंद्र पाटील यांना बळ देऊन या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. प्रवीण चव्हाण यांनाच सरकारी वकील म्हणून नेमण्यात आले.

सरकारी वकील म्हणून त्यांच्या नावाची कुणी शिफारस केली याचा तपशिल गृहखात्याचे पाठबळ फिर्यादी कै. नरेंद्र पाटलांना झाली एवढे मात्र निश्‍चित. जळगाव जिल्ह्यातील बहुतेक सर्व संवेदनशील खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. प्रवीण चव्हाण हेच काम पहात आहेत. जळगाव नगरपालिकेतील घरकूल घोटाळ्यात तब्बल 15-20 वर्षे गुन्हा दाखल झाला नव्हता. गुन्हा दाखल झाल्यावर त्यावर विशेष कारवाई केली जात नव्हती. तथापि महाराष्ट्र विरोधी पक्षाचे नेतेपदी एकनाथराव खडसे असतांना सुरेशदादा जैन यांचे आणि एकनाथराव खडसे यांचे राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार मिळाल्यानंतर खटल्याचे कामकाज सनसनाटी सुरू झाले. खटल्यातील मुख्य आरोपी जळगाव जिल्ह्यातील वजनदार नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन हे होते. त्यामुळे जळगाव शहर आणि जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचे इकडे लक्ष लागलेले होते. त्यामुळे दररोज वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांमुळे न्याय व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. त्यातच आरोपी सुरेशदादा जैन यांचेकडून पोलिसावर जे आरोप केले गेले त्यांचे भांडवल करून त्यांना जामीन मिळणार नाही अशी व्ययस्था घरकूल घोटाळ्यातील आरोपींना जामीन मिळण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

शेवटी हा खटला जळगाव सोडून धुळे येथील न्यायालयात स्वतंत्र कोर्टात चालविण्यात आला. परंतु या खट्ल्यामुळे प्रवीण चव्हाण गाजले. आता त्या खटल्याबाबत सुध्दा या स्ट्रिंग ऑपरेशनमुळे संशयाची सुई चव्हाणकडे दाखविली जाते. त्याचबरोबर बीएचआर पतपेढी घोटाळा, मराठा विद्याप्रसारक मंडळ, जामनेरचे शासकीय व्यापारी संकुल आदी खटल्यात सुध्दा हेच सरकारी वकील आहेत. त्यामुळे चव्हाणांच्या कृत्याकडे संशयानेच पाहिले जाते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.