राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली.दरम्यान काही दिवसांआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

बोलताना हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली कि , माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ यांच्यावर असलेले आरोप

1. गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याचा 100 कोटींचा घोटाळा

2. हा कारखाना मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्या ब्रिक्स इंडीया कंपनीला विकला गेला.

3. ही कंपनी बंगालमधील असून ती बंद आहे. या कारखान्याचे पैसे हे बंद कंपनीच्या बोगस खात्यावर ठेवण्यात आले आहेत.

4. हा कारखाना विकताना कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्य काम केले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.