धक्कादायक : सापाची हत्या ..अन पोस्टमॉर्टेममधून आले सत्य बाहेर .. !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

युपीमधल्या बागायत जिल्ह्यात एका १२ फुटी सापाला ठार मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र तरुण फरार झाला आहे. परंतु सापाचे पोस्ट मॉर्टेम केल्यानंतर या अहवालात सापाचा काठी आणि लोखंडी रॉडने मारल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समोर आल्याने अनेकजण अवाक झाले आहेत.

बागपतच्या छपरौलीमध्ये एका बारा फूट सापाला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. छपरौलीमधील शबगा गावात रामशरण नावाच्या तरुणाच्या घरात एक बारा फूट लांबीचा साप घुसला होता. या सापाला त्याच गावातील तरुण सुवालीन याने मारलं आणि त्यानंतर या सापाला लाकडी दांडक्यावर घेऊन तो गावभर फिरला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

या व्हिडीओची दखल वनविभागाकडून घेण्यात आली आणि संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्टमार्टमनंतर हत्येचा गुन्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साप मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाकडून या व्हिडीओची दखल घेण्यात आली. सापाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. पोस्टमार्टममध्ये या सापाला काठी आणि लोखंडी रॉडने मारल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तरुण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.