श्री गजानन महाराज फाउंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रेचे आयोजन

0

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

श्री सच्चिदस्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशन साकळी तर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही दि. २२ ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान साकळी ते श्री संतनगरी शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या १२ वर्षांपासून या फाउंडेशनतर्फे पदयात्रेचे आयोजन केले जात आहे. या वर्षाचे विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी पदयात्रेत नव्याने बनवण्यात आलेला आकर्षक व लक्षवेधी असा महाराजांचा रथ सहभागी होणार आहे. महाराजांचा रथ हा असंख्य भाविक- भक्तांच्या योगदानातून साकारला गेलेला असून रथ उज्जैन येथे तयार करण्यात आलेला आहे. या पदयात्रेत साकळीसह परिसरातून शेकडो सेवेकरी भाविक- भक्त सहभागी होणार आहे.

पदयात्रेच्या दिवशी मनवेल रस्त्यावरील जोशीज् फार्म येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात महाराजांच्या मूर्तीस साकळी येथील हजरत रशिदबाबा आश्रमाचे गादीपती जितेंद्र नेवे (छोटूबाबा) यांच्या हस्ते अभिषेक व पूजाविधी तसेच महाआरती केली जाणार आहे. यानंतर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेच्या मार्गात भाविकांकडून महाराजांच्या पादुकांचे पूजन केले जात असते. पदयात्रेच्या मार्गात रांगोळ्या काढून मार्ग सजविला जात असतो. अतिशय शिस्तीने पदयात्रेचे आयोजन केलेले असते. महाराजांच्या पदयात्रेमुळे गावात सर्वत्र भक्तीमय व मंगलमय असे वातावरण निर्माण होत असते.

पदयात्रेत सहभागी होण्यासाठी श्री गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी यांच्यासह मुकेश बोरसे (टेलर), वासुदेव मोते, पितांबर बडगुजर, हर्षल बाविस्कर, मनोज शिरसाळे, चंद्रकांत नेवे (पत्रकार), अमोल मोते, जगदिश मराठे, ईश्वर बडगुजर, जगदिश चौधरी, सुरेश देवमन चौधरी, गोपाल अलकरी (शिरसाड), दीपक अण्णा पाटील (मनवेल), भरत पाटील (मनवेल), प्रकाश चौधरी (पत्रकार) चुंचाळे, गणेश जोशी (यावल), ललित बारी (यावल) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.