गोल्डन ग्लोब पुरस्काराचा मानकरी “RRR”

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नुकताच लॉस एंजिलिसमध्ये 80 वा “गोल्डन ग्लोब पुरस्कार” (Golden Globe Awards) सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एस.एस.राजामौली (S.S .Rajamouli) यांच्या RRR या चित्रपटातील “नाटू नाटू” या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार (Award for Best Original Song) जिंकला आहे. हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे. या पुरस्कार सोहळ्याला दिग्दर्शक एस. एस. राजामौली, ज्युनिअर एनटीआर (Junior NTR), रामचरण (Ram Charan) आणि त्याची पत्नी उपासना यांनी हजेरी लावली होती . भारतीय सिनेसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये शर्यत लागलेली असते. RRR या चित्रपटाला दोन विभागांमध्ये नॉमिनेशन मिळालं. नॉन इंग्लिश लँग्वेज आणि बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर या दोन विभागांमध्ये RRR ला नामांकन मिळालं होतं.

‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक ठरले आहे. एम.एम.किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी या गाण लिहिले आहेत. RRR हा चित्रपट सर्वच प्रेक्षांच्या मनात घर करणारा ठरला होता. त्याचे डान्स, कथा, गाणे, ह्या सर्वांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. RRR हा चित्रपट प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी (Oscar Award) शॉर्टलिस्ट करण्यात आला होता. भारतकाडून पाठविण्यात आलेल्या पाच चित्रपटांमध्ये याचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.