Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»३३ लाखांचा संतूर साबण घेऊन ट्रकचालक झाला फरार ; अमळनेरात गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    ३३ लाखांचा संतूर साबण घेऊन ट्रकचालक झाला फरार ; अमळनेरात गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 11, 2023Updated:January 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमळनेरच्या विप्रो कंपनीतूमधून ३३ लाखांचा संतूर साबणाचा माल घेऊन ट्रकचालक फरार झाल्याने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अनिलकुमार माइसुख पुनिया (रा.मंगलमुर्ती चौक, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे कि, दि. ४ जानेवारी रोजी विप्रो लि. कंपनी, अमळनेर यांच्या कडील १८ टन १०० किलो तयार संतुर साबण तुमकुर (कर्नाटक) येथे पोहचवायची असल्याने मामा ट्रान्सपोर्ट कंपनी (अमळनेर) यांना याबाबतचे काम देण्यात आले. हा संपूर्ण माल भरलेला ट्रक हा चालक कैलास श्रीराम गुर्जर (रा. हर्षलो का खेडा पो. भागुनगर, ता. जहाजपुर जि. भिलवाडा राज्य राजस्थान) हा घेवून रवाना झाला होता, सदर वेळी चालकास अनिलकुमार पुनिया यांनी डिझेल व इतर खर्चा करीता ५० हजार रुपयांचे आय.यु.सी.एल. कार्ड दिले होते. त्यानुसार त्याने सदरचे कार्ड स्वीप करुन अमळनेर शहरातील प्रमुख पेट्रोलपंपावर डिझेल भरले होते व उरलेली रक्कम ही त्याने पोहच केल्यावर दिली जाणार होती.

    सदरचा माल ट्रक चालक याने मालासहित दि. ९ जानेवारी रोजी पावेतो तुमकुर (कर्नाटक) येथे पोहेचविणे अपेक्षीत होते. परंतु माल हा ठरलेल्या ठिकाणी न पोहेचल्याने अनिलकुमार पुनिया यांनी चालक कैलास श्रीराम गुर्जर याच्या तसेच ट्रक मालक पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर याच्या मोबाईलवर आणि नमुद ट्रक हा ज्या ट्रान्सपोर्टवरुन अमळनेर येथील ट्रॉन्सपोर्ट वर आला होता, त्या महाविर ट्रॉन्सपोर्टचे (जयपुर राज्य-राजस्थान) मालक मोहन बेरवा यांच्या मोबाईलवर देखील संपर्क केला. परंतू सर्वांचे मोबाईल बंद येत असल्याने तब्बल ३३ लाखांचा साबणाचा माल लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमळनेर पोलिसात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी ट्रक क्र. आर. जे. ११ जि.ए.८१३८ चे चालक- कैलास श्रीराम गुर्जर व ट्रक मालक- पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर (रा.मुरली विहार,देवरीठा, शाहगंज, आग्रा राज्य-उत्तरप्रदेश) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहेत..

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #jalgaon #amlnerpolice #wippro #santursabanchori
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif