शेतकऱ्यांनो ई-पीक पाहणीसाठी मुदत वाढ

५ लाख शेतकऱ्यांची अद्यापही नोंद नाही

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील ४ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनीही अजूनही पीक पेऱ्याची नोंद केलेली नाही. तर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रक्कमेपासून वंचित रहावे लागू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आपल्या पीक पेऱ्याची नोंद करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आता  १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे. जिल्ह्यात ६ लाख ९६ हजार ६१८ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी अद्याप २ लाख २ हजार ७१० म्हणजेच ३२.२७ टक्के शेतकऱ्यांनीच पीकपेरा नोंदवलेला आहे. अद्याप ६७.७३ टक्के शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविला नसल्याने ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांना आपल्या शेतात पीक पाहणी या मोबाईल ऍपद्वारे पीकपेरा नोंदवता येतो. यासाठी शेतकऱ्यांना शेतातील विविध पिकांची आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत होती. मात्र, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता या ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पीक विम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.