कृषी साहित्य प्रकरणी फिर्यादीच निघणार आरोपी

0

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रधानमंत्री कृषी सिंचाई अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना सन २०२१-२२अंतर्गत ठिंबक, तुषार साहित्या मधील तथा गैरव्यवहार प्रकरणी तालुका कृषी अधिकारी वसंत गणपत राठोड यांनी १५ सप्टेंबर २०२२ रोजी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीच्या अनुसंगाने शासनाच्या फसवणुकी सह विविध कलमान्वये जय भवानी कृषी केंद्राच्या मालकांवर आणि संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुशंगाने पी आय वाघ यांनी तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना तपास करण्याचे आदेश दिले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर तीन महिन्यांनी शासनमान्य समाजसेवा पुरस्कार प्राप्त चंद्रकांत खरात यांनी २०२१ पासून सदर प्रकरणातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी यंत्रणेला पत्रव्यवहार केलेला होता.

त्याच पूर्वसंध्येनुसार तीन महिन्यांनी विभागिय कृषी महासंचालक अमरावती विभाग अमरावती किसन मुळे यांनी मा आयुक्त (कृषि) कृषिआयुक्तालय महाराष्ट्र पुणे -५ यांना विभागीय चौकशीत खरात यांच्या पत्रा नुसार उपविभागीय कृषी अधिकारी मेहकर, मिसाळ यांनी जोडपत्र १ ते ४ मधे दोषी आढळून आलेले व जबाबदारी निश्चित करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी येणे प्रमाणे तालुका कृषी अधिकारी वसंत गणपत राठोड, सिंदखेडराजा, गोपाल बोरे,जी ए सावन्त, एस आर निंबाडकर,जी डी चौथे, सी एन, यांच्याविरुद्ध म.ना.से. (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील ८/१२ खाली विभागीय प्रस्ताव सुधारित करून या सोबत सादर करण्यात येत आहे, असे २१जानेवारी२०२३ विभागीय चौकशी अहवालात नमूद केले.

१५ सप्टेंबर २०२२ तालुका कृषी अधिकारी वसंत गणपत राठोड यांनी दिलेली पोलिसात तक्रार आणि विभागीय चौकशीत २१ जानेवारी २०२३ ला तालुका कर्षू अधिकारी वसंत गणपत राठोड हे सुद्धा तितकेच दोषी व जबाबदार असल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीच आरोपी होणार असल्याची शंका बळावली आहे. दैनिक लोकशाही प्रतिनिधीने तपास अधिकारी यात तथ्य आहे का? अशी प्रत्यक्ष रित्या विचारणा केली असता हसतमुख मुकसंमती मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.