विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने बेदम बदडले, गुन्हा दाखल

0

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुरु विद्यादानाचे महान काम करतात मात्र बोदवड येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  शाळेतील मुलांसोबत भांडण केल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याला शिक्षक आणि मुख्याध्यापकाने बेदम बदडले. इतकेच नव्हे तर त्याला शाळेतून देखील काढून टाकल्याची घटना टाकल्याची घटना बोदवड शहरातील चंद्रकांत हरी बढे उर्दू शाळेत घडला आहे. दरम्यान मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वडील शरीफ इब्राहिम मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक नदीम खान (रा. भुसावळ) व शिक्षक अत्तर उल्ला खान शाहीद उल्ला खान (रा. मलकापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड येथील चंद्रकांत बढे उर्दू शाळेत शेख तन्वीर शेख शरीफ मणियार (वय  १४) हा नववीत शिक्षण घेत आहे. २४ ऑगस्ट रोजी तनवीरचे शाळेतील मुलांसोबत भांडण झाले. या कारणावरून शिक्षक अत्तर उल्ला खान शाहीद उल्ला खान यांनी त्यास मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावले. या वेळी तन्वीर यास शिवीगाळ करून चापटबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

दरम्यान मारहाणीच्या घटनेनंतर २९ ऑगस्टला तन्वीर शाळेत गेला. मात्र, त्याला शाळेत जाण्यास उशीर झाल्याने मुख्याध्यापक कार्यालयात अत्तर उल्ला खान व मुख्याध्यापक नदीम खान यांनी पुन्हा लोखंडी पाइप व बुक्क्यांनी मारहाण केली. सोबत शाळा सोडल्याचा दाखला देऊन त्याला घरी पाठवले. त्यामुळे तन्वीरच्या वडिलांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.