पापकर्मला नष्ट करण्याची शक्ति तपस्यामध्ये – डॉ. पदमचंद्र म.सा.

0

 

[] प्रवचन सारांश- 04.09.2022 []

 

तपस्या मुळे करोड़ों भव  पाप कर्मला नष्ट करण्याचा एक मात्र उपाय आहे.  पापकर्मला नष्ट करण्याची शक्ति तपस्या मध्ये आहे. जळगाव येथील 100 पेक्षा अधिक तपस्या करणाऱ्या बालकांचे मला खुप कौतुक आहे.  ‘तप वह है जो कर्मों के ताप को नष्ट करें अर्थात कर्मों को तपाये। तपाने का आशय है जलाना। कर्मों को जलाने के लिए इससे श्रेष्ठ और कोई उपाय नहीं…’ असे  विचार पूज्य डॉ. पदमचंद्र म.सा. यांनी रविवारच्या विशेष प्रवचनात मांडले.  जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पूज्य पार्श्वचंद्र म. सा. आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.  आचार्य श्री  पूज्य  जयमलजी म. सा. यांच्या जयंतीच्या औचित्याने जळगावच्या 1 ते 15 वयोगटातील 100 पेक्षा अधिक आणि त्यासोबत प्रौढांनी देखील तपस्या केली त्यांचे त्यांनी विशेष कौतुक करून पूज्य जयमल जी महाराजांच्या चारित्र्याबाबत आपल्या प्रवचनातून सांगितले.

6 ते 8 सप्टेंबर दरम्यान पूज्य जयमलजी म. सा. यांच्या जयंतीच्या औचित्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 7 व 8 या दोन दिवसांचे कार्यक्रम जैन हिल्स येथे संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रवचनाच्या माध्यमातून करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.