मुलीच्या वाढदिवसानिमित्त मनोरुणांना स्नेहभोजन…

0

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील संत मुक्ताई कॉलनीत राहणाऱ्या सौ.अनिता व मनोज वाणी यांनी वेले तालुका चोपडा येथील मानवसेवा तीर्थ येथे मनोरुणांना स्नेहभोजन देऊन आपल्या मुलीचा दि ३ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला.

मनोज वाणी व सौ. अनिता वाणी यांची अंकिता ही एकुलती एक मुलगी, अंकिता ही इंजीनियरिंग असून पुढील ती मास्टर डिग्री (M.S) साठी अमेरिका येथे सहा महिन्यांपासून गेलेली आहे. त्यामुळे तिच्या अनुपस्थित कुटुंबीयांनी अंकिताचा २८ वा वाढदिवस त्यांनी मनोरुग्णांसोबत साजरा केला, त्यांना यावेळी त्यांनी स्नेहभोजन दिले. मानव सेवा तीर्थ आश्रमामध्ये सद्यस्थितीत १११ बेवारस मनोरुग्ण आहेत. जीवन सुख – दुःखाची झोळी आहे, मुला-मुलीत भेदभाव करू नका असा संदेश या निमित्ताने अंकिताचे आई वडील सौ. अनिता व मनोज वाणी यांनी दिला. या कार्यासाठी माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, मानव सेवा तीर्थ आश्रमचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील व अन्य सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.