वारंवार होते डोकेदुखी? ‘या’ जीवनसत्वाची आहे कमतरता

0

जळगाव ;- काही लोक अनेकदा डोकेदुखीची तक्रार करतात. काहींना संध्याकाळी डोकेदुखीचा त्रास सुरू होतो तर काहींना सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होते. कधीकधी ही डोकेदुखी इतकी वाढते की, ती एका आजाराचे रूप घेते ज्याला आपण मायग्रेन म्हणतो. नेमका हा आजार कशामुळे होतो? जाणून घ्या याबद्दल..

‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वारंवार डोकेदुखी होते

आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसा, कधीकधी ही डोकेदुखी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. वास्तविक, व्हिटॅमिन ‘डी’ चा मेंदूचे कार्य आणि मज्जातंतूंच्या कार्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. ..त्यामुळे डोकेदुखी सुरू होते
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, शरीरात सूज येते आणि तुम्हाला न्यूरॉन्सचा त्रास होऊ लागतो. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मायग्रेन आणि इतर डोकेदुखी होऊ लागते. यामुळे प्रथम मेंदूच्या आत सूज येते आणि नंतर तुमच्या न्यूरॉन्सवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नायट्रिक ऑक्साईड वाढून मज्जातंतूंच्या आवेग वाढतात आणि डोकेदुखी कारणीभूत ठरते. हे मॅग्नेशियमची पातळी कमी करते आणि मेलाटोनिनची पातळी वाढवते. त्यामुळे डोकेदुखी सुरू होते.

मायग्रेनची मूलभूत लक्षणे जाणून घ्या

मायग्रेनमध्ये होणारी डोकेदुखी ही अत्यंत गंभीर आणि त्रासदायक असते. हे लवकर नियंत्रणात येत नाही. तुम्हाला खालील लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाऊन यावर योग्य उपचार करण्याची गरज आहे.

उलटीसारखे होणे,सतत भीती वाटत राहणे,भूक न लागणे , डोकेदुखी होणे, डोळ्यासमोर अंधारी येऊन चक्कर येणे

डोकं सतत एकाच बाजूने ठणकत राहणे कोणत्याही गोष्टीने लवकर थकायला होणे अति प्रकाश, मोठा आवाज आणि कोणताही तीव्र गंध सहन न होणे
सतत मूड बदलत राहणे अंगाला सतत खाज येणे सतत उलटीसारखे आणि मळमळ होणे बधीरता येणे आणि असह्य डोकेदुखी सतत होत राहणे.

आपल्या आहारात अधिकाधिक व्हिटॅमिन डी पदार्थांचा समावेश करा

चीज
अंडी
मासे
दूध
सोयाबिन
संत्र्याचा रस
मशरूम

हायपरटेंशन टाळण्यासाठी..
भारतातील प्रत्येक चार प्रौढांपैकी एकाला हायपरटेंशन आहे. म्हणून, हे टाळण्यासाठी, आपल्या आहारात जास्तीत जास्त सुधारणा करा. जर तुमच्या शरीराला अन्नातून व्हिटॅमिन ‘डी’ चा पुरवठा होत नसेल तर, तुम्ही सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता. तसेच सकाळचा सूर्यप्रकाश घ्या. निरोगी खाण्याचा प्रयत्न करा आणि उत्तम जीवनशैली राखा.

Leave A Reply

Your email address will not be published.