मोकाट कुत्र्यांनी पाडला ११ बकऱ्यांचा फडशा

0

जळगाव – :मोकाट कुत्र्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला करीत फडशा पाडल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाल्मिक नगरात घडली. यामध्ये शेळी मालकांचे सुमारे दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. शिवाजी नगर परिसरात आणि उस्मानिया पार्क येथे लहान मुलांवर देखील या मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून त्यांचे लचके तोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. दरम्यान, वाल्मिक नगर परिसरातील वडामया भागात राहणारे प्रकाश चिंतामण कोळी यांच्या मालकीच्या ११ बकऱ्या त्यांनी शनिवार दि. ३० मार्च रोजी रात्री ११ वाजता घराच्या जवळ असलेल्या गोठ्यात बांधलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांनी बकऱ्यांना गंभीर जखमी कले. यामध्ये ११ बकऱ्या फस्त केल्याचे दुसऱ्या दिवशी रविवार दि. ३१ मार्च रोजी पहाटे ६ वाजता समोर झाले.

यावेळी तलाठी राहुल सोनवणे यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. शासनाकडून तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी कोळी कुटुंबियांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.