शास्तीची धास्ती ; जळगावकरांनी भरली ११० कोटींची थकबाकी

0

जळगावः ;- शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता जळगाव मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर १०० टक्के शास्ती माफीची अभय योजना दि.८ फेब्रुवारी पासून सुरू केली होती. तिचा कालावधी दि.३१ मार्च अखेर पर्यंत असल्यानेजळगाव महापालिकेच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात जास्त ११० कोटी रुपये मालमत्ता करापोटी वसूल झालेला आहे.दरम्यान सन २०२१-२२ मध्ये ५६ कोटी रुपये वसुली सन २०२२-२३ मध्ये १०६ कोटी रुपये यंदा २०२३-२४ मध्ये ११० कोटी रुपये वसुली झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांचे कडून १ कोटी ६० लाख रुपयांचा भरणा करून घेण्यात आलेला आहे. आज दि.१ एप्रिल पासून थकबाकी रकमेवर २४ टक्के शास्तीची आकारण्यात येणार आहे.

७५ हजार मालमत्ता धारकांनी भरला कर

यंदा शहरातून ७५ हजार १६० मालमत्ता करधारकांनी ११० कोटी रुपये मालमत्ता कर भरला आहे. त्यात १५ हजार ४०५ मालमत्ता करधारकांनी २०.७५ कोटी रुपये भरले ऑनलाईन भरला. ज्या थकबाकी मालमत्ता धारकांनी शास्ती माफी अभय योजनेचा लाभ दिल्यावर सुद्धा लाभ घेतलेला नाही. अशा थकबाकी करधारकांवर आज १ एप्रिल पासून थकबाकी रकमेवर शास्तीची आकारणी मनपा प्रशासनाकडून केली जाणार आहे. तसेच थकबाकी मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याबाबत कार्यवाही मनपा प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात येत असून अशा मालमत्तांवर बोजा चढवण्याची कार्यवाही ही मनपा अधिनियम अंतर्गत करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.