सुप्रीम कॉलनीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

0

जळगाव : – शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या ४३ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

अरुण मधूकर पाटील (वय ४३, मूळ रा. पष्टाणे, ता. धरणगाव, ह. मु. सुप्रिम कॉलनी) असे मयताचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील मूळ रहिवासी अरूण मधुकर पाटील हेआपल्या पत्नी आणि दोन मुलांसह शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात वास्तव्याला होते. एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामाला जावून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ते पत्नीला बाहेर जावून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय झोपलेले असतांना अरूण पाटील यांनी त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर बाहेरच्या जिन्यातून छतावर गेले. तिथे पडदीला दोरीच्या मदतीने गळफास घेवून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.अरुण पाटील यांनी छतावर गळफास घेतल्याने पहाटे ४ वाजता शेजारचांच्यालक्षात आले.

अरुण पाटील यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी निता, मुलगा अदित्य आणि मुलगी साक्षी असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.