खुशखबर ! LPG सिलिंडर झाला स्वस्त

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सर्वसामान्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आज 1 एप्रिलपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.

राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी, मुंबईत 31.50 रुपये, चेन्नईमध्ये 30.50 रुपये आणि कोलकातामध्ये 32 रुपयांनी कमी झाली आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला आढावा घेतल्यानंतर सरकारकडून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जातात.

या कपातीनंतर दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरचा दर 1764.50 रुपये झाला आहे. पूर्वी तो 1795 रुपये होता. त्याच वेळी, चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1930 रुपयांपर्यंत खाली आली आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1717.50 रुपये आणि 1879 रुपये झाली आहे.

सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता तसेच देशातील इतर लहान आणि मोठ्या शहरांमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती सारख्याच आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.