दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश: धुळे पोलिसांची कारवाई

0

धुळे : जळगाव जिल्ह्यासह धुळे आणि साक्री येथील विविध दाखल घरफोड्याच्या गुन्ह्यांची उकल धुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली असून जळगाव जिल्ह्यातील कजगाव (ता.भडगाव) येथे दराेडा टाकण्याच्या तयारीने निघालेल्या गुंडांच्या टोळीतील एका अल्पवयीन मुलाला  पोलिसांनी रविवारी रात्री गरताड बारीजवळ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, कटर मशीन, मिरचीची पूड व कार, दुचाकी असा एकूण १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धुळे गुन्हे शाखेने मोहाडी हद्दीत दरोड्याचा डाव उधळत विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले तर साथीदार मात्र पसार झाले. तपासादरम्यान बालकाच्या कबुली जवाबातून धुळे व जळगाव जिल्ह्यातील तब्बल दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. पसार आरोपींनी गोंडगाव, ता.भडगाव येथे मेडिकल दुकानासह सराफा दुकानात चोरी केल्याचा प्रकार तसेच मेहुणबारे, पारोळा येथील तसेच साक्री पोलिस ठाणे हद्दीतील पाच गुन्हे तर धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आणला

 

कुविख्यात गुन्हेगारांचा दोन जिल्ह्यात धूमाकूळ
अल्पवयीन बालकाने दरोड्याच्या गुन्ह्यात संशयित वरुणसिंग टाक (दाहोद, गुजराथ), मुकूंदर जुनी (नंदुरबार), आकाश मांग (नंदुरबार), वरुणसिंग टाक याचा मित्र असल्याचे सांगत आरोपींनी 31 जानेवारी रोजी कोळगाव, ता.भडगाव येथून वॅगन आर कार चोरल्याची कबुली दिली शिवाय 2 जानेवारी रोजी कोळगाव येथे मेडिकल दुकानात चोरी केल्यानंतर भऊर, ता.चाळीसगाव येथे कारचे पेट्रोल संपल्याने कार सोडून देण्यात आली व बहाळ गावातून पुन्हा अल्टो चोरण्यात आल्याची माहिती दिली.

दहा गुन्ह्यांची कबुली
आरोपींनी मेहुणबारे, पारोळा, ता.जळगाव व गोंडगाव, ता.भडगाव, धुळ्यातील चाळीसगाव रोड येथे प्रत्येकी एक तर जानेवारी महिन्यात साक्री पोलिस ठाणे हद्दीतील दिघावे, छडवेल पखरूण, किरवाडे गावात चोर्‍या केल्याची कबुली दिली.

ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक् किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखा निरीक्षक दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, श्याम निकम, दिलीप खोंडे, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, संदीप सरग, हेेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संतोष हिरे, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, अशोक पाटील, प्रकाश सोनार, तुषार सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, योगेश साळवे, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी, नितीन मोहणे, जगदीश सूर्यवंशी, सुशील शेंडे, कमलेश सूर्यवंशी, निलेश पोतदार, राजीव गीते, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.