राईनपाडा गावात पाच भिक्षुकांना ठेचून मारणाऱ्या सात आरोपींना जन्मठेप; धुळे न्यायालयाचा निकाल , 21 जणांची निर्दोष सुटका

0

धुळे ;- सोलापूर येथील पाच भिक्षुकांची धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात सामूहिक हत्या करणाऱ्या सात आरोपींना धुळे विशेष न्यायालयाने सोमवारी जन्मठेपची शिक्षा सुनावली असून 21 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आले आहे. एफ एम जे ख्वाजा यांनी हा निकाल दिला.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे सोलापूरच्या पाच भिक्षुकांची चुकीच्या बातम्यांमुळे ग्रामस्थांनी हत्या केल्याचा प्रकार १ जुलै २०१८ रोजी घडला होता. या दिवशी राईनपाड्यात मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याचे मेसेज सोशल मीडियावर धडकल्याने त्यावर विश्वास ठेवून गावकऱ्यांनी गावात आलेल्या पाच भिक्षकांवर हल्ला चढवून त्या पाचही जणांना ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन जमावाने लाठ्या-काठ्यांनी त्यांची ठेचून हत्या केल्याचा प्रकार घडला होता.

 

या खटल्यामध्ये एकूण 35 जणांची साक्ष घेण्यात आले . समाज माध्यमांवर येणाऱ्या चुकीच्या बातम्यांमुळे इतकी भयानक घटना घडू शकते असे देखील शिक्षा सुनावताना न्यायालयाने आधोरेखीत केले. नाथपंथीय डावरी समाजाचे भिक्षुक दादाराव शंकरराव भोसले वय ४७ ,भरत शंकर भोसले वय 45 ,राजू मामा उर्फ श्रीकांत भोसले 45, भारत शंकर माडवे 45 ,चौघे राहणार खंबे आणि अग्नि श्रीमंत इंगोले रा.  मानेवाडी जिल्हा सोलापूर यांची गावकऱ्यांनी हत्या केली होती.

 

यांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

माहरू ओंकार पवार, दशरथ काल्या पिंपळसे, हिरालाल आत्माराम गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज चौरे ,मोतीलाल साबळे ,यापैकी सहा जण तुरुंगातच असून तर सातवा जामीनावरील काळू गावित हा फरार असल्याने कोर्टाने त्याच्याविरुद्ध वॉरंट बजावले आहे.

याप्रकरणी सरकारच्या वतीने पोलीस कर्मचारी रवींद्र रणधीर यांनी तक्रार दिली होती त्यानुसार तत्कालीन उपाध्यक्ष श्रीकांत घुमरे व त्यांच्या पथकाने तपास करून सुमारे 913 पानांचे दुसरे पत्र दाखल केले होते त्यावरील 26 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. तर खटल्याचे कामकाज सुरू असताना पस्तीस जणांची साक्ष झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.