मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री पवार यांनी केले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
पाळधी; ता. धरणगाव ;- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री यांचे नुकतेच निधन झाले असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची व कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव विमानतळाकडे रवाना झाले .